परभणीत 26 मोकाट श्वान जेरबंद; पथकाची कारवाई सुरू
परभणी, 17 मार्च (हिं.स.)। शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी परभणी शहर महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून नियुक्त पथकांनी आतापर्यंत 26 श्वानांना जेरबंद केले आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागांतर्गत मोकाट
26 मोकाट श्वान जेरबंद; पथकाची कारवाई सुरू


परभणी, 17 मार्च (हिं.स.)। शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी परभणी शहर महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून नियुक्त पथकांनी आतापर्यंत 26 श्वानांना जेरबंद केले आहे.

महापालिकेच्या कोंडवाडा विभागांतर्गत मोकाट श्वानांना पकडण्यासाठी तीन विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या मोहिमेचा शुभारंभ महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख व आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते पथकाच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 8 श्वानांना पकडण्यात आले, तर मंगळवार (दि. 17 मार्च) रोजी आणखी 18 श्वानांना जेरबंद करण्यात आले. पकडलेल्या श्वानांची नसबंदी करून पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. शहरातील मोकाट श्वानांची समस्या पूर्णतः आटोक्यात येईपर्यंत ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून, कोंडवाडा प्रमुख विनय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचारी ही कारवाई राबवत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande