अकोला - मूर्तिजापूर मध्ये नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांचे आंदोलन
अकोला, 17 मार्च (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेत आज कर्मचारी संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. नगर परिषद कार्यालयातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर शासकीय कंत्राटदाराने कथित मारहाण केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेच्या वतीने का
Photo


अकोला, 17 मार्च (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेत आज कर्मचारी संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. नगर परिषद कार्यालयातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर शासकीय कंत्राटदाराने कथित मारहाण केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. या घटनेचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयात कार्यरत असलेल्या एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास शासकीय कंत्राटदाराकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले.

कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालय परिसरात एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच संबंधित कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली. या आंदोलनामुळे काही काळ नगर परिषद कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाल्याचेही पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande