छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची बैठक; संघटन बळकटीकरणावर भर
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मराठवाडा विभागीय कार्यालयात पार पडली. या बैठकीस भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
Q

बैठकीदरम्यान पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर, कार्यपद्धती गतिमान करण्यावर तसेच आगामी उपक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी माजी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे , जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, प्रदेश सचिव रेखा कुलकर्णी तसेच माजी महापौर बापूर घनमोडे यांची उपस्थिती होती. शहर व ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजपची विचारधारा व कार्य व्यापक पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

 rajesh pande