पंधराव्या वित्त आयोगाच्या अखेरीस ७६.३९ कोटींचा निधी; खर्चासाठी ग्रामपंचायतींची धावपळ
अमरावती, 17 मार्च (हिं.स.) : पंधराव्या वित्त आयोगाची मुदत ३१ मार्च रोजी संपत असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ऐन शेवटच्या टप्प्यात मोठा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ८३५ ग्रामपंचायतींना एकूण ७६ कोटी ३९ लाख ७६ हजार २६६ रुपयांचा निधी वितरित कर
पंधराव्या वित्त आयोगाच्या अखेरीस ७६.३९ कोटींचा निधी; खर्चासाठी ग्रामपंचायतींची धावपळ


अमरावती, 17 मार्च (हिं.स.) : पंधराव्या वित्त आयोगाची मुदत ३१ मार्च रोजी संपत असताना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ऐन शेवटच्या टप्प्यात मोठा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ८३५ ग्रामपंचायतींना एकूण ७६ कोटी ३९ लाख ७६ हजार २६६ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, त्यातील किमान ५० टक्के निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींसमोर निधी वेळेत खर्च करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वित्त आयोगाचा निधी वेळेत खर्च न झाल्यास पुढील निधी वितरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विविध विकासकामांना गती देत मार्चअखेरपर्यंत खर्च पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, बंधित निधीचा दुसरा हप्ता म्हणून ३२ कोटी ७४ लाख रुपये अद्याप शासनाकडे प्रलंबित असून, त्याची ग्रामपंचायती प्रतीक्षा करत आहेत. जिल्ह्यात २०२०-२१ पासून पंधरावा वित्त आयोग लागू असून, दरवर्षी या आयोगामार्फत निधी वितरित केला जातो. या निधीपैकी सुमारे ८० टक्के निधी ग्रामपंचायतींना, तर १०-१० टक्के निधी जिल्हा परिषद व पंचायत समितींना दिला जातो. मात्र, सध्या संबंधित संस्थांमध्ये प्रशासक असल्याने त्या स्तरावर निधी वितरण झालेले नाही. सन २०२५-२६ हे पंधराव्या वित्त आयोगाचे अंतिम वर्ष असल्याने मागील काही महिन्यांत निधीचे हप्ते प्राप्त झाले. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान अबंधित व बंधित निधीचे विविध हप्ते मिळून एकूण ७६ कोटींपेक्षा अधिक निधी ग्रामपंचायतींना मिळाला आहे. मात्र, कमी कालावधीत मोठा निधी खर्च करण्याचे आव्हान आणि उर्वरित हप्त्याची प्रतीक्षा यामुळे ग्रामपंचायतींची धावपळ वाढली आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande