अमरावती : सिलिंडर तुटवडा व महागाईमुळे विवाह सोहळे धोक्यात
अमरावती, 17 मार्च (हिं.स.) जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले असून, दर्यापूर शहरातील मंगल कार्यालये व कॅटरिंग व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. सिलिंडरचा तुटवडा, इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक
युद्धजन्य परिस्थितीचा फटका : सिलिंडर तुटवडा व महागाईमुळे विवाह सोहळे धोक्यात


अमरावती, 17 मार्च (हिं.स.) जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले असून, दर्यापूर शहरातील मंगल कार्यालये व कॅटरिंग व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. सिलिंडरचा तुटवडा, इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे विवाह सोहळ्यांवर मोठा परिणाम दिसून येत आहे.लग्न समारंभासाठी लागणारे धान्य, भाजीपाला, गॅस, डिझेल तसेच इतर साहित्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने कॅटरिंग व्यवसायिकांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. परिणामी अनेक कुटुंबांनी नियोजित विवाह सोहळे साध्या पद्धतीने पार पाडण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.उन्हाळा हा विवाह सोहळ्यांचा हंगाम मानला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत मंगल कार्यालयांमधील बुकिंगमध्ये घट झाल्याचे संचालक सांगत आहेत. कॅटरिंग व्यावसायिकांच्या मते, परिस्थिती अशीच राहिल्यास कोरोनाच्या काळाप्रमाणे पुन्हा निर्बंधांची स्थिती निर्माण होऊ शकते.दरम्यान, कॅटरिंग व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने कामगारांच्या रोजगारावरही गदा येत आहे. अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडर संपल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली आहे. पर्यायी स्वयंपाकाच्या साधनांचा अभाव आणि कुशल कामगारांची कमतरता यामुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत.या पार्श्वभूमीवर शासनाने गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करून व्यवसायाला दिलासा द्यावा, अशी मागणी कॅटरिंग व मंगल कार्यालय व्यावसायिकांकडून केली जात आहे. परिस्थिती लवकर पूर्ववत होऊन विवाह हंगाम सुरळीत सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande