रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे २९ मार्चला गीतरामायण
रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या सहकार्याने २९ मार्च २०२६ रोजी गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, २९ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे २९ मार्चला गीतरामायण


रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या सहकार्याने २९ मार्च २०२६ रोजी गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी, २९ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात महाकवी गदिमा आणि स्वरगंधर्व बाबूजी यांची अजरामर कलाकृती गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला संवादिनीसाथ चैतन्य पटवर्धन, व्हायोलिनसाथ उदय गोखले, संवादिनीसाथ निरंजन गोडबोले, बासरीवादन प्रसन्न जोशी, तबलासाथ निखिल रानडे, तालवाद्य शार्दूल मोरे, की बोर्ड ऊर्जा आपटे, मंजिरी राघव पटवर्धन हे साथीदार करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन पूर्वा पेठे करणार आहेत. ध्वनिसंयोजन एस् कुमार साऊंड यांचे आहे. या कार्यक्रमाला प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande