परभणी - रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महापौर इकबाल यांच्याकडून ईदगाह मैदानाची पाहणी
परभणी, 17 मार्च (हिं.स.)। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांनी ईदगाह मैदानाची पाहणी करून विविध उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचनांचे निर्देश दिले. यावेळी उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह सहाय्यक आयुक्त जु
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महापौर सय्यद इकबाल यांची ईदगाह मैदानाची पाहणी


परभणी, 17 मार्च (हिं.स.)। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांनी ईदगाह मैदानाची पाहणी करून विविध उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचनांचे निर्देश दिले.

यावेळी उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी, स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, कुणाल भाळसाकळे, अभियंता लोढे, जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव आदी उपस्थित होते. महापौरांनी ईदगाह मैदानाची स्वच्छता करून पाणी टाकून रोलरच्या साहाय्याने मैदानाची दबई करण्याच्या सूचना दिल्या.रमजान ईद (ईद-उल-फित्र) हा सण 20 किंवा 21 मार्च 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता साजरा होणार असल्याने महानगरपालिकेकडून शहरातील ईदगाह मैदान, अमिनसाब बाबा दर्गा, साखला प्लॉट, लोहगाव रोड, पिंगळगड आदी ठिकाणी नमाजासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शामियाना, कमान, सतरंजी, टेबल-खुर्च्या तसेच सोप, सुपारी व खडीसाखर यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.नमाजस्थळी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय, परिसरातील खड्डे बुजवून मैदान समतल करणे, तसेच पथदिवे व हायमास्ट दिवे सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय मोकाट जनावरे व डुकरांचा शिरकाव रोखण्यासाठी ईदगाह मैदान व कब्रस्तान परिसरात लोखंडी जाळीचे बॅरिकेट्स उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. अग्निशमन विभागाने आवश्यक कर्मचाऱ्यांसह सतर्क राहावे, तसेच स्वच्छता विभागाने शहरातील रस्ते व नाल्यांची नियमित स्वच्छता करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. शहरातील सर्व नमाजस्थळी स्वच्छता व सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागांना आदेश देण्यात आले असून, ईदपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande