धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त परभणीत बुधवारी मुकपदयात्रा
परभणी, 17 मार्च (हिं.स.)।धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीच्या वतीने बुधवार दि. १८ मार्च रोजी शहरात भव्य मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गेल्या एक महिन्याप
धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त परभणीत बुधवारी मुकपदयात्रा


परभणी, 17 मार्च (हिं.स.)।धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीच्या वतीने बुधवार दि. १८ मार्च रोजी शहरात भव्य मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यातील हजारो शिव-शंभूपाईकांनी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास’ म्हणून व्रत पाळत दररोज अभिवादन केले आहे. या पार्श्वभूमीवर फाल्गुन अमावस्येच्या दिवशी ही मुकपदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ही मुकपदयात्रा शहरातील शनिवार बाजार येथून सायंकाळी ७.१५ वाजता सुरू होणार असून शहरातील प्रमुख मार्गाने जात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील शिवतीर्थ मैदान येथे समारोप होणार आहे. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित गीत, श्लोक व ध्येयमंत्र पठण करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.

या मुकपदयात्रेत शहरातील सर्व शिव-शंभूपाईक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शंकर देशमुख (अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – परभणी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande