विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा प्रथम
रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : दै. लोकसत्ताच्या जिल्हा निर्देशांक उपक्रमात सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्
विकास निर्देशांकात रत्नागिरी जिल्हा प्रथम


रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : दै. लोकसत्ताच्या जिल्हा निर्देशांक उपक्रमात सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविला.

येत्या शुक्रवारी, दि. 20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबईतील द ताज बाय विवांता (कफ परेड) येथे होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्गदेखील उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande