छ. संभाजीनगरात ३८ व्यावसायिक मालमत्ता सील
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील व्यावसायिक मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, १३ दिवसांमध्ये तब्बल ३८ मालमत्तांना सील ठोकले आहे. या मालमत्ताधारकांकडे ७कोटी ७० लाख २१ हजार ७०६ रुपयांचा कर
छ. संभाजीनगरात ३८ व्यावसायिक मालमत्ता सील


छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील व्यावसायिक मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून, १३ दिवसांमध्ये तब्बल ३८ मालमत्तांना सील ठोकले आहे. या मालमत्ताधारकांकडे ७कोटी ७० लाख २१ हजार ७०६ रुपयांचा कर थकलेला आहे.

मालमत्ताधारकांकडील थकित कर वसूलीसाठी मनपा आयुक्त जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त विकास नवाळे यांच्या आदेशाने थेट जप्तीच्या कारवाया केल्या जात आहेत. शहरातील सर्व १ ते १० झोन मधील सहायक आयुक्तांना व्यावसायिक थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिकाघेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत ३८ मालमत्ता जप्त केल्या आहेत. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील (थकित कर ७,८०,३३६ रुपये), व (६,१६,०४४ रुपये), सेंट्रल नाका रोडवरील व्हीआयपी हॉलसमोरील होम फर्निचर (थकित कर ७,५७,०००), पिसादेवी रोडवरील भक्तीनगर येथील (थकित कर १५,५७,९०१ रुपये) या चार व्यावसायिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या., अशी माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande