
बीड, 17 मार्च, (हिं.स.)। बीड येथील श्री युवा माहेश्वरी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी राजेश्वर तापडिया तर सचिवपदी विजय डागा यांची सर्वानुमते निवड झाली आहे. शहरातील एमआयडीसी भागात पार पडलेल्या विशेष बैठकीत मान्यवरांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेचे माजी सहसचिव अमर सारडा, मावळते अध्यक्ष ऋषीकेश सोहनी आणि सचिव अनूप चरखा यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी गोपाल लद्दड, कोषाध्यक्षपदी आशिष कासट, सहसचिवपदी अजय डागा तर संघटनमंत्री म्हणून युवराज चरखा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीनंतर संघटनेच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिर, सुंदरकांड, कुलदेवी प्रोजेक्ट आणि दांडिया यांसारख्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे बहुसंख्य सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे समाजस्तरातून स्वागत होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis