दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी यूटीआय फ्लेक्सी-कॅप फंड एक आकर्षक पर्याय
दर्जेदार व्यवसायांमध्ये गुंतवणुकीतून दीर्घकालीन आर्थिक मूल्य वाढविण्याची संधी नाशिक, 17 मार्च (हिं.स.) : कोणत्याही गुंतवणूकदारासाठी आर्थिक ध्येय निश्चित करणे हे यशस्वी गुंतवणुकीच्या प्रक्रियेतील पहिली पायरी असते. सातत्यपूर्ण चांगला परतावा मिळविण्य
प्रतिकात्मक  लोगो


दर्जेदार व्यवसायांमध्ये गुंतवणुकीतून दीर्घकालीन आर्थिक मूल्य वाढविण्याची संधी

नाशिक, 17 मार्च (हिं.स.) : कोणत्याही गुंतवणूकदारासाठी आर्थिक ध्येय निश्चित करणे हे यशस्वी गुंतवणुकीच्या प्रक्रियेतील पहिली पायरी असते. सातत्यपूर्ण चांगला परतावा मिळविण्यासाठी विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार केला जातो, पण दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळवण्यासाठी गुंतवणुकीशी संबंधित जोखीम समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. या दृष्टीने, ‘म्युच्युअल फंड’ हा लहान कालावधीसाठी तसेच दीर्घकालीन आर्थिक ध्येय साध्य करण्याचा प्रभावी मार्ग ठरतो.

यूटीआय फ्लेक्सी-कॅप फंड हे ओपन-एन्डेड इक्विटी फंड्सपैकी एक असून, एकूण मालमत्तेचा किमान 65 टक्के हिस्सा लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांच्या इक्विटीमध्ये गुंतवला जातो. 1992 मध्ये सुरू झालेला हा फंड सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो, आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी याची एकूण मालमत्ता 22,800 कोटी रुपयांहून अधिक आहे.फंडाचे गुंतवणूक तत्त्वज्ञान ‘गुणवत्ता, वाढ आणि मूल्यांकन’ या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. गुणवत्ता म्हणजे दीर्घकालीन RoCE आणि RoE उच्च ठेवणाऱ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणे, तर वाढ म्हणजे स्थिर आणि सातत्यपूर्ण वाढीच्या क्षमतेवर भर देणे. मूल्यांकनाच्या दृष्टीने, P/E गुणकासह व्यवसायाच्या रोख प्रवाह आणि पुन्हा गुंतवणुकीच्या संधींचा अभ्यास करून दीर्घकालीन आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या व्यवसायांची निवड केली जाते.

या फंडाचा प्रमुख उद्देश ग्रोथ इन्व्हेस्टमेंट शैलीचा अवलंब करून बाजारातील सर्व भांडवल प्रकारांमध्ये गुंतवणूक करणे आहे. प्रमुख समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, टायटन कंपनी, कोटक महिंद्रा बँक आणि पर्सिस्टंट सिस्टीम्स यांचा समावेश असून, फंडाच्या एकूण गुंतवणुकीत या शीर्ष 10 समभागांचा सुमारे 44 टक्के वाटा आहे.

यूटीआय फ्लेक्सी-कॅप फंड दीर्घकालीन भांडवल वाढविण्याचा विचार करणाऱ्या मध्यम जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे. मुख्यत्वे इक्विटी पोर्टफोलिओ उभारून दर्जेदार व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेले गुंतवणूकदार किमान 5 ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी हा फंड निवडू शकतात. अशा दीर्घकालीन गुंतवणुकीतून आर्थिक मूल्य निर्माण होण्याची क्षमता जास्त असल्याने, फंड गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा प्रभावी पर्याय ठरतो.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande