गॅस टंचाई : अमरावतीत केरोसीन वितरण पुन्हा सुरू करण्याची मागणी
मरावती, 18 मार्च (हिं.स.) : शहरात सध्या निर्माण झालेल्या गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बंद असलेली केरोसीन (रॉकेल) वितरण प्रणाली तातडीने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी
केरोसीनचे वाटप पुन्हा सुरू करा विक्रेत्यांची शासनाकडे मागणी, जिल्हाकचेरीवर धडकले


मरावती, 18 मार्च (हिं.स.) : शहरात सध्या निर्माण झालेल्या गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बंद असलेली केरोसीन (रॉकेल) वितरण प्रणाली तातडीने पुन्हा सुरू करावी, अशी मागणी अमरावती शहरातील केरोसीन हॉकर्स संघटनेने केली आहे.

संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातही जाणवत असून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरम्यान, सिलिंडरच्या किमतीत झालेली वाढ ही गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेली असून त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. दुसरीकडे, अमरावती शहर व जिल्ह्यातील रॉकेल विक्रेते गेल्या 8 ते 10 वर्षांपासून बेरोजगार आहेत, कारण रॉकेल वितरण बंद आहे.

सध्याच्या परिस्थितीत रॉकेलचा वापर पुन्हा आवश्यक ठरत असल्याने अमरावतीसाठी रॉकेलचा कोटा निश्चित करून वितरणास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी अमरावती जिल्हा केरोसीन हॉकर्स रिटेलर युनियनचे अध्यक्ष राज सुनील साहू, उपाध्यक्ष दिनेश ठाकरे तसेच सागर मोहोड, देवेश साहू, दादाराव कलाने, सुरेश गुप्ता, संतोष गुप्ता, मनोज साहू, फहिम गुड्डू, सैय्यद फारुख, विक्की गुप्ता, राहुल साहू, कन्हैय्यालाल गोयल, भारत सरवैय्या, सैय्यद इशहाक, एस. आर. मन्सुरी आदींसह अनेक परवानाधारक विक्रेते उपस्थित होते.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande