
बीड, 18 मार्च (हिं.स.)।
पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील प्रसिद्ध बाजीबाबा देवस्थान येथे अखंड अन्नछत्र उभारण्यात आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यासन अधिकारी कृष्णा जाधव यांच्या संकल्पनेमधून अन्नछत्र सुरू करण्यात आले.
गृह विभागाचे उपसचिव रवींद्र औटे यांच्या उपस्थितीमध्ये ह.भ.प काका महाराज बोधले यांच्या हस्ते अन्नछत्र उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दासखेड येथील बाजीबाबा देवस्थान राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. कृष्णा जाधव यांच्या संकल्पनेमधून मंदिराच्या
जिर्णोदराचे काम सुरू आहे. सोबतच देवस्थानावर येणाऱ्या भाविकांना प्रसादरुपी जेवण मिळावे या संकल्पनेमधून अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.
गृह विभागाचे उपसचिव रवींद्र औटे यांच्या उपस्थितीत ह.भ.प काका महाराज बोधले यांच्या हस्ते अन्नछत्राचा शुभारंभकरण्यात आला. यावेळी राणोजी ठोंबरे, माने, शिंदे, चव्हाण, पारगावचे सरपंच पद्माकर घुमरे, पाचंग्रीचे सरपंच गणेश मुंडे, भाऊसाहेब भराटे, मधुकर कोकाटे, केशव रसाळ, गणेश कोकाटे आदी उपस्थित होते. अन्नछत्रासाठी माळेवाडीचे ग्रामस्थ, अशोक कोकाटे, युवराज कोकाटे यांनी धान्य दिले. गणेश कोकाटे यांनी हयात भर मीठ पुरवण्याचा संकल्प जाहीर केला. तालुक्यात अखंड अन्नछत्र सुरू करणारे बाजीबाबा देवस्थान एकमेव आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis