कडक उन्हात महिलांची उन्हाळी कामांसाठी लगबग, कुरड्या, पापड, शेवया, सांडगे घालण्यात दिवस
बीड, 18 मार्च (हिं.स.)। ग्रामीण भागात मार्च एप्रिल-मे महिन्यात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी उन्हाळी कामे सध्या जोरात सुरू झाली आहेत. यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने महिलांनी उन्हाळी पदार्थ तयार करण्याची लगबग लवकरच सुरू केली असून
कडक उन्हात महिलांची उन्हाळी कामांसाठी लगबग, कुरड्या, पापड, शेवया, सांडगे घालण्यात दिवस


बीड, 18 मार्च (हिं.स.)।

ग्रामीण भागात मार्च एप्रिल-मे महिन्यात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी उन्हाळी कामे सध्या जोरात सुरू झाली आहेत. यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढल्याने महिलांनी उन्हाळी पदार्थ तयार करण्याची लगबग लवकरच सुरू केली असून गावागावांत कुरड्या, पापड, शेवया, सांडगे, चिप्स यासारख्या पदार्थांची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

ग्रामीण भागातील महिलांसाठी उन्हाळा म्हणजे वर्षभरासाठी लागणाऱ्या सुक्या पदार्थांची तयारी करण्याचा महत्त्वाचा काळ मानला जातो. सण-उत्सव तसेच रोजच्या जेवणात लागणारे पापड, कुरड्या, ज्वारी-बाजरी व तांदळाच्या पापड्या, गव्हाच्या व रव्याच्या शेवया, खारवड्या, बटाट्याचे चिप्स, सांडगे आदी पदार्थ या काळात मोठ्या प्रमाणावर तयार करून साठवले जातात. त्यामुळे गावोगावी घरांच्या अंगणात, ओसरीवर किंवा मोकळ्या जागेत उन्हात सुकवलेल्या पापड-कुरड्यांच्या रांगाच दिसून येतात. या कामासाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असल्याने महिलांना

कडक उन्हाचा सामना करत दिवसभर मेहनत घ्यावी लागते. सकाळी लवकर उठून धान्य धुणे, दळणे, पीठ तयार करणे, चिक (मिश्रण) शिजवणे, पापड लाटणे किंवा कुरड्या टाकणे अशी कामे महिलांकडून केली जातात. त्यानंतर तयार केलेले पदार्थ उन्हात वाळवण्याचे काम केले जाते. या प्रक्रियेत घरातील लहान मुले-मुलीही महिलांना मदत

गॅसवर हे पदार्थ तयार करणे महागात तर पडत आहेच सध्या गॅस मिळत नसल्याने ग्रामीण भागात महिलांनी चुलीला प्राधान्य दिले आहे. पहाटेपासूनच अंगणात चुली पेटवून मोठ्या भांड्यात मिश्रण शिजवण्याचे काम सुरू होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande