थकित करापोटी अकोला शहरात मालमत्तांवर सीलची कारवाई
अकोला, 18 मार्च (हिं.स.)। मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशा नंतर तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहा.आयुक्त देविदास निकाळजे यांच्या मार्गदर्शनात दक्षिण झोन अंतर्गत हिंगणा रोड, मंगरूळपीर रोड येथील वार्ड क
Photo


अकोला, 18 मार्च (हिं.स.)।

मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशा नंतर तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहा.आयुक्त देविदास निकाळजे यांच्या मार्गदर्शनात दक्षिण झोन अंतर्गत हिंगणा रोड, मंगरूळपीर रोड येथील वार्ड क्रं. डी-6 मालमत्ता क्रं. 2297 बशीर खा रशीद खान यांच्याकडे सन 2021-22 ते आजपर्यंत एकुण मालमत्ता कर 1,50,242/- थकित असल्याने सदर मालमत्तावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे, तसेच वार्ड क्रमांक डी-6 मालमत्ता क्रमांक 2374 धारक मां गायत्री परिवार ट्रस्ट रा. गायत्री नगर, मंगरूळपीर रोड यांच्याकडे सन 2017-18 ते 2025-26 पर्यंत ऐकुण मालमत्ता कर 11,69,086/- थकित असल्याने त्यांचे कार्यालयावर सील लावण्याची कार्यवाही करण्यात आली.

सदर कार्यवाहीत सहा कर अधीक्षक प्रशांत बोळे, वार्ड लिपिक संतोष काळे तसेच सुरक्षारक्षक गुलाम मुस्तफा गुलाम दस्तगीर खान, सोनू गायकवाड आदींची उपस्थित होती.

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना त्यांचा थकित मालमत्ता कराचा भरणा करणे आर्थिक दृष्ट्या सोईचे व्हावे यासाठी मनपा प्रशासनाव्दारा दि. 14 फेब्रुवारी पासून शास्ती अभय योजना सुरू करण्यात आली असून थकित मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला थकित कराचा भरणा एकरकमी करून अटकावनी, जप्ती व लीलाव सारख्या अप्रीय कारवाई टाळावे असे आवाहन मनपा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande