
नाशिक, 18 मार्च (हिं.स.)।
- नाशिक जिल्ह्याला बेमोसमी पावसाचा जोरदार फटका बसला असून जिल्ह्यातील सुमारे पाच तालुक्यांना पावसाने तडाखा दिल्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यामध्ये पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला होता. या अंदाजानुसार बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील कळवण देवळा चांदवड सिन्नर निफाड या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक गारपीटीसह या परिसरामध्ये पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धावपळ दिसून आली. अनेकांच्या शेतामध्ये काढून ठेवलेला गहू तसेच कांदा आणि काही प्रमाणामध्ये द्राक्षांना देखील या बेमुखी पावसाचा फटका बसला आहे जोरदार गारा पडल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कृषी विभागाला तातडीने पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV