गॅस, इंधन पुरवठ्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त
रायगड, 18 मार्च (हिं.स.)।आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. संभाव्य अडचणींचा
गॅस, इंधन पुरवठ्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त


रायगड, 18 मार्च (हिं.स.)।आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. संभाव्य अडचणींचा वेळीच सामना करता यावा यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

घरगुती एलपीजी गॅस संदर्भातील तक्रारी व समस्यांचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात पुरवठा निरीक्षण अधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तालुकानिहाय संपर्क अधिकारी व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे :

पनवेल – आश्विनी धनवे – 9967897440

उरण – महेश पाटील – 7775993113

कर्जत – रवींद्र दळवी – 9049186296

खालापूर – मनोज पवार – 7403397777

अलिबाग – हर्षल देशमुख – 7889740652

मुरुड – महेंद्र गांगुर्डे – 9011961234

पेण – सतीश शिंदे – 9890891853

रोहा – हेमलता कुरसुंगे – 8390646988

सुधागड (पाली) – सुखदेव वाढणकर – 8605939636

माणगाव – राहुल शितोळे – 8668747983

तळा – नागेश शेगोकर – 9822210076

श्रीवर्धन – रुपाली सुने – 7028469443

म्हसळा – चंद्रशेखर खोत – 9226971925

महाड – योगिता सत्यगिरी – 9284632144

पोलादपूर – रितेश पदलमवार – 9404102128

जिल्ह्यातील नागरिकांनी गॅस सिलिंडर किंवा इंधन पुरवठ्यात अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1077 वरही संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत माध्यमांवरूनच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. गॅस व इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande