
मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुढी पाडवा तसेच नूतन वर्षानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो.
गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर