
परभणी, 18 मार्च (हिं.स.)।
अनुचित व्यापार पद्धतीविरोधात व शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी सुमारे 51 वर्षांपूर्वी अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना केली. आज या चळवळीचे वटवृक्षात रूपांतर झाले असून ग्राहक संरक्षण कायदा लागू होण्यात या चळवळीचा मोठा वाटा आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्थेमुळे ग्राहकांचे प्रश्न सोडवले जात आहेत, असे प्रतिपादन डॉ. विलास मोरे यांनी केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मानवत तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या अनुषंगाने शहरातील संत सावतामाळी रोडवरील डॉ. सचिन चिद्रवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे उपस्थित होते. बैठकीस पर्यावरण आयाम प्रमुख संभाजी शिराळे, शिवाजी दिवटे, सचिन रायपत्रीवार, रमाकांत जोशी आदी उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्षपदी डॉ. सचिन चिद्रवार तर शहराध्यक्षपदी श्याम झाडगांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुका कार्यकारणीत उपाध्यक्षपदी प्रकाश करपे, सचिव डॉ. विजयकुमार कहेकर, कोषाध्यक्ष संजय बांगड, लीगल सेल प्रमुख अॅड. मुकुंद पाटील, आयटी सेल प्रमुख प्रा. गजानन आंबेकर, पर्यावरण आयाम प्रमुख अनंत बंडे, रोजगार सृजन आयाम प्रमुख प्रा. राजाभाऊ डुकरे, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख सदानंद भरड, ग्राहक मार्गदर्शन सेवा प्रमुख रामानंद मंत्री, तर सदस्य म्हणून मंचक जाधव (आंबेगाव), दीपक दुगाने (वझुर), नारायण होंडे (रुढी), अनुरथ सुरनर (मंगरूळ) यांची निवड करण्यात आली.तसेच शहर कार्यकारणीत उपाध्यक्षपदी जयप्रकाश मिटकरी, सचिव प्रसाद जोशी, कोषाध्यक्ष सूर्यकांत माळवदे, लीगल सेल प्रमुख ड. आकाश कडतन, आयटी सेल प्रमुख विनोद केरे, पर्यावरण आयाम प्रमुख किरण रुद्रकंठवार, रोजगार सृजन आयाम प्रमुख गणेश गहुले, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख बापू महाजन, ग्राहक मार्गदर्शन सेवा प्रमुखपदी संजय महात्मे, तर सदस्य म्हणून अनंत विभुते व रमेश त्रिपाठी यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, उपाध्यक्ष भगवान करंजे व सोपानराव टोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis