त्र्यंबकेश्वरला आता एक दिवसआड पाणीपुरवठा
Water supply to Trimbakeshwar every other day from today
त्र्यंबकेश्वरला आता एक दिवसआड पाणीपुरवठा


त्र्यंबकेश्वर, 18 मार्च (हिं.स.)।

- त्र्यंबक नगरपरिषद प्रशासनाने गुढीपाडव्यापासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर शहराचे दोन भागात विभाजन करत एका भागाला एक दिवस आणि दुसऱ्या भागाला दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे. दोन दिवसांत एकदा म्हणजेच ४८ तासात एक वेळ ४५ मिनीटे पाणी पुरवठा होणार आहे. साठवणुकीची सुविधा नसलेल्या नागरिकांना ४८ तास अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ मिळालेले पाणी जपून वापरावे लागणार आहे. शहरात सार्वजनिक पाणवठे नाहीत. कपडे धुणे आणि वापराचे पाणी भरून आणता येईल, असे नितळ पाणी साठे नाहीत. त्यामुळे नागरिकांची विशेषतः गृहिणींची गैरसोय होत असते. सधन कुटुंब टँकरचे पाणी विकत घेतात. पिण्यासाठी जार वापरतात. मात्र सर्वसामान्य

नागरिक दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय सहन करतात. ग्रामीण भागात बरे, असे म्हणत असतात. दरम्यान वीज पुरवठा खंडीत होता. तेव्हा ४८ तासांची मुदत ७२ तासांवर जाते. असे देखील अधूनमधून घडत आहे. अशा प्रकारचे नगर परिषद प्रशासनाला सोयीचे असलेले नियोजन मार्च २००७ पासून सुरू आहे. दरम्यानच्या कालावधीत सन २०१५ मध्ये सिंहस्थ होऊन गेला आणि आता २०२७ च्या सिंहस्थाची विकासकामे होत आहे. सन १९९२ च्या सिंहस्थापासून प्रत्येक वेळेस नियोजन करताना पाणीपुरवठा योजना मजबुत करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च होत आहे. मात्र सन १९९० च्या दरम्यान त्र्यंबक शहराला एका दिवसात दोन वेळा मिळणारे नळाचे पाणी १९९९ पासून एका वेळेला आणि पुढे मार्च २००७ पासून उन्हाळयाचे चार महिने एक, दिवसाआड करण्यात येत आहे.

दरम्यानच्या कालावधीत झालेल्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत दररोज २४ तास पाणीपुरवठा करण्याचे अश्वासन दिले जाते. मात्र ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. या जाहीरसभेत २४ तास शुद्ध नियमीत पाणीपुरवठा करण्याचे अश्वासन दिले. मात्र अवघ्या दोन अडीच महिन्यांत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र सन २००७ पासून आजपर्यंत उन्हाळ्यात मार्च ते जूनपर्यंत एक दिवसआड आहे. पाणीपुरवठा होत असतो. शहराला अहिल्या, अंबोली-व गौतमी अशा तीन योजनांचा पाणीपुरवठा असताना कधी वीज नाही, तर कधी पाणीसाठा आटला या आटला या कारणांनी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये तांत्रिक दोष हे निवारण करण्यात नगरपरिषदेला आलेले अपयश कारणीभूत ठरले असून जिल्हा प्रशासनासह लेोकप्रतिनिधींनी केलेले दुर्लक्ष नागरिकांसह भाविकांचे हाल वाढवणारे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande