
कोल्हापूर, 18 मार्च (हिं.स.)।
जेष्ठांचे सामाजिक,मानसिक व शारीरिक स्वास्थ सुधारण्याच्या अनुषंगाने विरंगुळा केंद्रे ही ज्येष्ठांना आधार देतात. ग्रामपंचायत स्तरावर लोक सहभागातून विरंगुळा केंद्रात ज्येष्ठांची गरज ओळखून त्यांना अपेक्षित सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने कार्यरत राहावे असे आदेश दिले.
त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात हाताने मैला उचलण्याच्या दृष्टीने फारसे सफाई कामगार नसले तरी स्वच्छतेच्या दृष्टीने जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनी सुरक्षा विषयक साहित्य वापरावे तसेच अशा कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग घेण्यात यावे, अशी सूचना यावेळी केली.
समाज कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या बैठकांसाठी जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, महिला बाल विकास अधिकारी सुहास वाइंगडे, मैत्री संघटनेच्या सुहासिनी देवमाने, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अशासकीय सदस्य बाळासाहेब फरकाटे यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी - कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar