
अकोला, 19 मार्च (हिं.स.)।
राज्यात नाफेड कडून खरेदी करताना रबी 24-25 साठी हरभरा पिकाच्या खरेदी उत्पादन २५ क्विंटल प्रति हेक्टर मर्यादेमध्ये वाढ करा अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात शासनाकडे केली आहे.
राज्यात यावर्षी रब्बी हंगाम २०२४-२५ मधील उत्पादीत हरभरा पिकाची नाफेड मार्फत शासकीय आधारभूत किंमती मध्ये खरेदी सुरु असून नोंदणीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे. अकोला जिल्ह्यातील बहुंशी क्षेत्र खारपान पट्ट्यात मोडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी या भागातील शेतकरी कोरडवाहू रब्बी हरभरा पिकाचे प्राधान्याने उत्पादन घेतात, याशिवाय या क्षेत्रात हरभरा पिकांचे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात होते, यावर्षी सुद्धा सुमारे ३० ते ३५ क्विंटल प्रतिहेक्टर हरभरा पिकाचे उत्पादन झाले आहे. परंतू शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजने मध्ये यावर्षी अकोला जिल्ह्यासाठी १५. ३६ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मर्यादा शासनाने निश्चित केली आहे. सदर उत्पादन मर्यादा कमी असल्याने त्यामध्ये वाढ करुन किमान २५ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या लगत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी १८.२३ क्विंटल प्रतिहेक्टर तर अमरावती जिल्ह्यासाठी २५ क्विंटल प्रतिहेक्टर इतकी उत्पादन निश्चित केली आहे.यावर्षी हरभरा पिकाकरिता शासन आधारभूत प्रतिक्विंटल किंमत ५८७५ रुपये इतकी असून खुल्या बाजारामध्ये सुमारे ५००० रुपये प्रतिक्विंटल इतकी असल्याने शेतक-यांचे सुमारे १००० प्रतिक्विंटल आर्थिक नुकसान होत आहे. हरभरा उत्पादन शेतक-यांना उत्पादन मर्यादा वाढवून न दिल्यास त्यांना वाढून उत्पादन नाईलाजाने कमी भावात विकण्याची वेळ येऊ नये करिता शासनाने उत्पादन मर्यादा वाढवावी अशी औचित्याच्या मुद्याद्वारे आमदार रणधीर सावरकरांनी शासनास आग्रही मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे