मानखुर्दमध्ये गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात
मुंबई, १९ मार्च (हिं.स.) : मानखुर्द येथे गुढी पाडव्याच्या पावन पर्वानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करताना परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले
स्वागत यात्रा


मुंबई, १९ मार्च (हिं.स.) : मानखुर्द येथे गुढी पाडव्याच्या पावन पर्वानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करताना परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी भाजपचे मुख्य प्रवक्ते व नगरसेवक नवनाथ बन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित नागरिकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत, हिंदू संस्कृती आणि परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या शोभायात्रेत ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विविध सांस्कृतिक देखावे, भगव्या पताका आणि आकर्षक सजावट यामुळे संपूर्ण मानखुर्द परिसर दिमाखात सजला होता.

या शोभायात्रेत स्थानिक नागरिक, तरुण मंडळे, महिला भगिनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हा सोहळा हिंदू एकात्मता, संस्कृती आणि उत्साह यांचे प्रतीक ठरला. आयोजकांच्या वतीने सर्व सहभागी नागरिकांचे आभार मानण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande