
डोंबिवली, 19 मार्च (हिं.स.)।
गुढीपाडव्याच्या पावन निमित्ताने डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेली भव्य स्वागत यात्रा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. हिंदू नववर्षाचे स्वागत करताना संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्सवमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
या स्वागत यात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांची मान्यवर उपस्थिती लाभली. तसेच नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनीही सहभाग नोंदवत उत्सवाची शोभा वाढवली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज आणि आकर्षक सांस्कृतिक देखावे यामुळे ही यात्रा विशेष ठरली. युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला.अशा स्वागत यात्रांमुळे समाजात एकता, बंधुभाव आणि संस्कृतीचे जतन अधिक बळकट होते. गुढीपाडवा हा नवचैतन्य, विजय आणि समृद्धीचा संदेश देणारा सण असून, सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश नांदो हीच सदिच्छा दिल्या. डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनच्या व्यासपिठावर भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित दर्शविली. यावेळी अध्यक्ष सागरमल इटोदिया, दिलीप कोठारी, जितू नाहर, महावीर बडाला यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi