इराण युद्धविरोधी भूमिकेनंतर अमेरिकन अधिकारी अडचणीत
एफबीआयकडून गोपनीय माहिती लीक प्रकरणी चौकशीवॉशिंग्टन, 19 मार्च (हिं.स.) : इराणविरुद्धच्या संभाव्य युद्धाला विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा देणारे माजी वरिष्ठ दहशतवादविरोधी अधिकारी Joe Kent यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याव
इराण युद्धावर टीका केल्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यावर चौकशीची कारवाई


एफबीआयकडून गोपनीय माहिती लीक प्रकरणी चौकशीवॉशिंग्टन, 19 मार्च (हिं.स.) : इराणविरुद्धच्या संभाव्य युद्धाला विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा देणारे माजी वरिष्ठ दहशतवादविरोधी अधिकारी Joe Kent यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्यावर गोपनीय माहिती लीक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हिस्टीगेशनने (एफबीआय) यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे.

केंट यांनी मंगळवारीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या चौकशीला सुरुवात झाली. ते National Counterterrorism Center (राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र) चे संचालक म्हणून कार्यरत होते. इराणसोबतच्या युद्धाबाबत मतभेद असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा United States Department of Justice गेल्या वर्षभरात विविध राजकीय प्रकरणांमध्ये सक्रिय आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधकांविरोधात अनेक चौकशा सुरू करण्यात आल्या असून, त्यामध्ये माजी एफबीआय संचालक जेम्स कॅमे आणि न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटिटीया जेम्स यांचाही समावेश आहे. तथापि, काही प्रकरणांमध्ये न्यायालयांकडून अभियोजन पक्षाला धक्का बसल्याचे दिसून आले आहे.

केंट यांनी ट्विटरवर (एक्स) निवेदन प्रसिद्ध करत आपल्या राजीनाम्याची पुष्टी केली. त्यांनी इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईवर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, अमेरिकेला इराणकडून तातडीचा धोका नव्हता. तसेच, इस्रायल आणि अमेरिकेतील प्रभावशाली लॉबीच्या दबावामुळे युद्धाचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना केंट यांची भूमिका “कमकुवत” असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, इराणला धोका मानत नसलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या प्रशासनात आवश्यकता नाही. याशिवाय सेंट्रल इन्व्हिस्टीगेशन एजन्सी (सीआयए)चे संचालक John Ratcliffe यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही केंट यांच्या विधानांपासून स्वतःला दूर ठेवले आहे.

दरम्यान, या प्रकरणात नेमक्या कोणत्या मुद्द्यांची चौकशी केली जात आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. केंट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी त्यांच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.---------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande