जळगावात २१-२२ मार्चला ‘अमृत  थेट बाजारपेठचे’ आयोजन
जळगाव, 20 मार्च, (हिं.स.) स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (AMRUT) या संस्थेतर्फे ‘अमृत थेट बाजारपेठ’ हा उपक्रम २१ व २२ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. राज्
जळगावात २१-२२ मार्चला ‘अमृत  थेट बाजारपेठचे’ आयोजन


जळगाव, 20 मार्च, (हिं.स.) स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (AMRUT) या संस्थेतर्फे ‘अमृत थेट बाजारपेठ’ हा उपक्रम २१ व २२ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जळगावकरांना देखील याचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या बाजारपेठेत एकूण ३६ स्टॉल उभारण्यात येणार असून त्यापैकी ३० हून अधिक स्टॉल महिला उद्योजकांचे असणार आहेत. ग्राहकांना थेट उत्पादकांकडून स्वदेशी व घरगुती दर्जेदार वस्तू खरेदी करता येणार आहेत. यामध्ये मसाले, रेडी फूड, इमिटेशन ज्वेलरी, हँडमेड वस्तू, साड्या, आयुर्वेदिक उत्पादने, पापड, वाळवण आदींचा समावेश आहे. तसेच तांबूलपान, खापरवरील पुरणपोळी व गरमागरम जेवणाचे स्टॉलही खवय्यांसाठी आकर्षण ठरणार आहेत. स्वदेशी उत्पादनांना चालना देणे, स्थानिक उद्योजकांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादने देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत कुटुंबासह उपस्थित राहून या बाजारपेठेला भेट देण्याचे आवाहन संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande