माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रिसेप्शनवरून ५२,५५० रुपयांची चोरी
रायगड, 20 मार्च (हिं.स.) – उपजिल्हा रुग्णालयासारख्या गजबजलेल्या ठिकाणीही चोरीच्या घटना थांबत नाहीत, अशी धक्कादायक घटना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आली आहे. रिसेप्शन टेबलवर ठेवलेल्या ५२,५५० रुपयांच्या वस्तू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याच
Mobile phone stolen from Mangaon Upazila Hospital; Goods worth Rs 52,000 looted from reception


रायगड, 20 मार्च (हिं.स.) – उपजिल्हा रुग्णालयासारख्या गजबजलेल्या ठिकाणीही चोरीच्या घटना थांबत नाहीत, अशी धक्कादायक घटना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आली आहे. रिसेप्शन टेबलवर ठेवलेल्या ५२,५५० रुपयांच्या वस्तू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास ही चोरी घडली. महिला फिर्यादी (रा. बालाजी कृपा बिल्डिंग, उतेखोल, ता. माणगाव) यांच्या मालकीचे साहित्य रिसेप्शन टेबलवर ठेवले असताना अज्ञात इसमाने संधी साधून वस्तू लंपास केल्या.

चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये ४०,००० रुपयांचा वनप्लस मोबाईल, १२,००० रुपयांचा रेडमी मोबाईल, ५०० रुपयांचा चार्जर व डेटा केबल आणि ५० रुपयांचा स्टील स्टेपलर यांचा समावेश आहे.

या घटनेमुळे रुग्णालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८१/२०२६ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहेे.

------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande