रुपाली चाकणकर फरार… बजाव टाली - रुपाली पाटील
पुणे, 20 मार्च (हिं.स.) - नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करत संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यातच आता रूपाली पाटील-ठोंबरेनी चाकणकर फरार असल्याची प
रुपाली चाकणकर रुपाली पाटील


पुणे, 20 मार्च (हिं.स.) - नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करत संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यातच आता रूपाली पाटील-ठोंबरेनी चाकणकर फरार असल्याची पोस्ट केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यात ‘राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार … बजाव टाली’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टनंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात यापूर्वी सुद्धा अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तर भोंदू अशोक खरात याच्या व्हिडिओवरून आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकरांवर थेट हल्ला चढवला आहे. चाकणकरांचे या भोंदूसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर खासदार संजय राऊतांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे.

ठोंबरे-पाटील यांनी पुढे म्हटलंय की, चाकणकर यांनी भोंदू बाबाला साथ दिली आहे आणि महिलांचा बलात्कार देखील घडवून आणलाय. भोंदू बाबांना पाणी पुरवण्यापासून तर बायका पुरवण्यापर्यंत सगळं काम चाकणकर यांनी केले. चाकणकरसारख्या महिला जर पक्षात असतील तर बाकी महिलाही काम करायला जरा घाबरतील. मलाही विचार करावा लागेल. विखे पाटील, एकनाथ शिंदे यांचे भोंदू बाबा सोबतचे फोटो पाहिले पण ते काय पाय धुवायला गेले नाहीत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना मी रीतसर निवेदन देणार आहेत आणि राजीनामाची मागणी देखील करणार आहे. संपदा मुंडे प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा राजीनामा अजित पवारांनी मागवला होता, मात्र त्यावेळी सुनील तटकरे यांनी तो राजीनामा घेऊ दिला नाही. रूपाली चाकणकरांना कोण पाठीशी घालत आहे हे येत्या काही दिवसातच समोर येईल. अशोक खरात (भोंदू बाबा) प्रकरणाशी चाकणकर यांचे जवळचे संबंध आहेत. खरातच्या संस्थेवर त्या सदस्य आहेत आणि या गुन्ह्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे त्यांना या प्रकरणात 'सह-आरोपी' करावे, अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande