लातूर - मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार
लातूर, 20 मार्च, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मतदार याद
मतदार यादी


लातूर, 20 मार्च, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे कामे सुरू झाली असून, मतदारांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.

या अनुषंगाने १) Blurr Photo (धूसर किंवा अस्पष्ट छायाचित्र दुरुस्त करणे), २) DSE (Demographically Similar Entries - समान लोकसंख्याशास्त्रीय नोंदी तपासणी व दुरुस्ती), ३) SIR Mapping (मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी नकाशा संलग्नीकरण/मॅपिंग) आणि Book a Call (BLO सोबत कॉल बुकिंग) इत्यादी कामे तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. हे कामे प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer - BLO) यांनी आपल्या नेमणुकीच्या क्षेत्रातील मतदारांना समक्ष भेटून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

२३५ लातूर शहर विधानसभा मतदार संघ आणि २३४ लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी आपल्या रहिवासी मतदान केंद्रातील बीएलओ यांच्याशी समक्ष भेट घेऊन वरील कामे पूर्ण करून घ्यावीत. याशिवाय मतदार नावातील दुरुस्ती, वगळणी (Deletion) किंवा इतर आवश्यक बदलांसाठीही बीएलओ यांच्याकडे संपर्क साधावा. SIR Mapping चे काम २१ मार्च २०२६ नंतरही सुरू राहणार आहे. २००२ च्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://voters.eci.gov.in/searchInSIR/S2UA4DPDF-JK4QWODSE या अधिकृत लिंकचा वापर करावा. मतदारांनी मतदार यादीच्या या सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक राहण्यास मदत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande