
लातूर, 21 मार्च, (हिं.स.)। राज्याचे सहकार मंत्री तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब पाटील ,बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले, याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख हेही उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक सुविधा, आकर्षक रचना व सर्वसुविधांनी सुसज्ज असलेल्या या नव्या इमारतीमुळे परिसरातील शेतकरी, सभासद व ग्राहकांना अधिक जलद, दर्जेदार व सुलभ बँकिंग सेवा मिळणार आहे.
याच कार्यक्रमात औसा मार्केट, जवळगा (पो.) आणि लामजना येथील तीन शाखांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे बँकेच्या सेवांचा विस्तार अधिक व्यापक होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सुविधा अधिक सहज उपलब्ध होणार आहेत.
सहकारातून समृद्धी या ध्येयाने प्रेरित होऊन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातत्याने प्रगती करत असून, शेतकरी व सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना व उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार यावेळी चेअरमन धीरज देशमुख यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis