उन्हाळी सुट्ट्यासाठी मध्य रेल्वेची विशेष गाड्यांची घोषणा
मुंबई, 21 मार्च (हिं.स.) : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि पुणे – नागपूर या मार्गांवर विशेष ग
रेल्वे लोगो


मुंबई, 21 मार्च (हिं.स.) : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि पुणे – नागपूर या मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०१०२१ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२:५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३:४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल.परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०२२ ही विशेष गाडी ३ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.या विशेष गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.

गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, नऊ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande