ऐन उन्हाळयात केडीएमटी एसी बस सेवा ठप्प
डोंबिवली, 21 मार्च (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या सर्व एसी बसेस ठेकादाराचा ठेका संपल्याने काल शुक्रवारी सायंकाळ पासून ठप्प झाल्या आहेत. परिणामी प्रवाशांची नेहमीच गर्दीने चालणारी आणि सर्वात फायद्याची अशी डोंबिवली स्टेशन बाजीप्रभ
Photo 1


डोंबिवली, 21 मार्च (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या सर्व एसी बसेस ठेकादाराचा ठेका संपल्याने काल शुक्रवारी सायंकाळ पासून ठप्प झाल्या आहेत. परिणामी प्रवाशांची नेहमीच गर्दीने चालणारी आणि सर्वात फायद्याची अशी डोंबिवली स्टेशन बाजीप्रभू चौक ते एमआयडीसी निवासी वातानुकूल (AC) बस सेवा ऐन उन्हाळ्यात बंद झाल्याने नागरिक हवाईदिल, त्रस्त झाले आहेत.

याबाबत खात्रीशीर माणसाने सांगितल्यानुसार एसी बस चालविण्याचे ठेकेदाराचे कंत्राट मुदत ही गेल्या आठ महिन्यापूर्वीच संपली असल्याने ठेकेदाराने सदर एसी बस या सर्वच ठिकाणाच्या चालविण्यात येणाऱ्या एसी बस सेवा बंद केल्या आहेत. संबंधित ठेकेदार एकूण आठ एसी बस चालवीत होता परंतु आता त्या न चालविल्यामुळे अशाच धुळखात पडणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिककेत प्रशासक राजवट संपून लोकनियुक्त प्रतिनिधी राजवट सुरु आहे. त्यांनी आता अशा ठेकेदारी कंत्राट पद्धतीवर लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे अशी चर्चा आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

तसेच डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील धर्मवीर आनंद दिघे उद्यान हेही सुरक्षा रक्षक ठेकेदाराचे कंत्राट संपल्याने तेथेही सुरक्षा रक्षक नसतो. स्थानिक एक ज्येष्ठ नागरिक फक्त ते सकाळी उघडून बंद करीत आहे. सायंकाळी हे उद्यान कुलूपबंद असते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व बाळगोपाळ मंडळी यांना ऐन सुट्टीत उपयोग करीता येत नाही.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande