
नाशिक, 21 मार्च (हिं.स.)। चित्रकूटला गुप्त गोदावरी आहे. जेथे जेथे गोदावरी गुप्त होते, तेथे तेथे श्रीरामाने दीर्घ काळ वास्तव्य केले. रामाने पहिली पर्णकुटी चित्रकूट येथे बांधली, असे प्रतिपादन सतीश चुरी यांनी केले. श्रीकाळाराम संस्थानतर्फे आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात 'श्रीराम व दंडकारण्य दिव्य' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
सतीश चुरी म्हणाले, पूर्वी नाशिकचे नाव पदमनगर होते, तेथे श्रीराम अगस्ती मुनींनी भेटायला येतात. पंचवटी तपोवनात खर, दूषण आणि इतर राक्षस ऋषीमुनींनी ठार मारीत होते. येथे घनघोर वन होते. राम जेव्हा येथे येतो, तेव्हा तो येथील राक्षसकांना ठार करतो. एक सामान्य मानव पराक्रम दाखवतो. म्हणून रावण येथे स्वतः येतो. मारीच हरणाचे रूप घेऊन येतो, त्याच्या मागे राम गेल्यानंतर लक्ष्मण तिकडे जन्य अगोदर सौम्यतिथी विद्येने रेषा आखली ही विद्या लक्ष्मणाला वशिष्ठ ऋषींनी दिली होती. राम व लक्ष्मण नसताना तो सीतेचे अपहरण करतो. तिला पुष्पक विमानातून घेऊन जातो. तिचा शोध घेण्यासाठी राम व लक्ष्मण हे पंचवटी सोडून पुढे जातात. पुढे त्यांना अगस्ती ऋषीचा आश्रम लागतो. तेथे सफाट पर्वतावर विमान कसे उडवायचे ही विद्या शिकवतात. ही अगस्तपुरी म्हणायचे तेच नाव पुढे अपभ्रंश होऊन इगतपुरी झाली.
रावणाने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी शिवतांडव स्तोत्र म्हटले आणि प्रसन्न करून घेतले. रावणाची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती. रावणाला अप्सरेने शाप दिला होता, त्यामुळे तो सीतेला स्पर्श करू शकला नाही, असे श्री. चुरी यांनी सांगितले. श्रीकाळाराम संस्थाचे विश्वस्त शुभम मंत्री, अक्षय कलंत्री उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV