संत परंपरेने दिलेला विचार आणि अध्यात्मिक मूल्ये जपण्याचे कार्य भजन स्पर्धांमधून होते : आ.बनसोडे
लातूर, 21 मार्च, (हिं.स.)। गेल्या अनेक वर्षापासुन मानव सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सामुहिक खुल्या वारकरी सांप्रदायिक भजन स्पर्धा आयोजीत करुन संबंध महाराष्ट्रात आपल्या गावचे नाव वाढविले आहे. भजन ही केवळ कला नसून
भजन


लातूर, 21 मार्च, (हिं.स.)। गेल्या अनेक वर्षापासुन मानव सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व सामुहिक खुल्या वारकरी सांप्रदायिक भजन स्पर्धा आयोजीत करुन संबंध महाराष्ट्रात आपल्या गावचे नाव वाढविले आहे. भजन ही केवळ कला नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. संत परंपरेने दिलेला विचार आणि अध्यात्मिक मूल्ये जपण्याचे कार्य अशा स्पर्धांमधून होत असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते मानव सेवा प्रतिष्ठाण शेल्हाळच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या सामुहिक खुल्या वारकरी सांप्रदायिक भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. प्रशांत महाराज खानापुरकर, उध्दव महाराज हैबतपुरे, श्रीरंग महाराज औसेकर, जि.प. अध्यक्ष उषा पाटील, भगवानराव पाटील, माजी उपसभापती रामराव बिरादार,

तहसिलदार विकास बिरादार, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जि.प. सदस्य डाॅ.दिपक सोमवंशी, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर बिरादार, नगराध्यक्षा सौ.स्वाती हुडे, नगरसेवक सचिन हुडे, बापुराव राठोड, आयोजक सुरेश लांडगे, सुधीर भोसले, बाळासाहेब मरलापल्ले, सुर्यशिला मोरे, जयश्री बेल्लाळे, उमाकांत तपशाळे, प्रा.श्याम डावळे, वसंत पाटील,संतोष गिरी महाराज, हंसराज हुलसुरे, माधवराव कल्याणे, राजकुमार गर्जे, तहसीलदार विकास बिरादार, प्रशांत मांगुळकर, दत्ता पाटील, ज्ञानेश्वर मोरे आदी उपस्थित होते.

शेल्हाळ येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतून या स्पर्धेत यवतमाळ, नागपूर, अमरावती, अकोला, नवी मुंबई, ठाणे, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, आदी ठिकाणाहुन स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande