रत्नागिरी : 114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक
रत्नागिरी, 23 मार्च, (हिं. स.) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी निवडणुका २८ एप्रिल रोजी होणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दि. 28 एप्
संग्रहित फोटो


रत्नागिरी, 23 मार्च, (हिं. स.) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी निवडणुका २८ एप्रिल रोजी होणार आहेत.

ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका दि. 28 एप्रिल रोजी होणार आहेत, त्या ग्रामपंचायत हद्दीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असे उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande