रत्नागिरी : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानासाठी जनजागृती
रत्नागिरी, 23 मार्च, (हिं. स.) : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉनसारखे विविध उपक्रम आयोजित करून व्यापक जनजागृती करावी. तसेच 10 वी व 12 वीतील मुलींसाठी कौशल्य विकास आणि
बेटी बचाव अभियान आढावा बैठक


रत्नागिरी, 23 मार्च, (हिं. स.) : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉनसारखे विविध उपक्रम आयोजित करून व्यापक जनजागृती करावी. तसेच 10 वी व 12 वीतील मुलींसाठी कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन मेळावे घेऊन एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मल्लीनाथ कांबळे, परिवीक्षा अधिकारी अनिल माळी आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे योजनेचा सविस्तर आढावा दिला. मुलींना मुलांप्रमाणे समान दर्जा मिळवून देणे, स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर संतुलित ठेवणे, लिंगनिवडीस प्रतिबंध करणे, स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींना संरक्षण देणे, त्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे आणि मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी जिंदल यांनी पोलीस पाटील, सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांना पीसीपीएनडीटी, पोक्सो, आरटीई व बालविवाह प्रतिबंध या विषयांवर प्रबोधन करण्याचे निर्देश दिले. तसेच योजनेच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला. बैठकीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कृती आराखड्याला मान्यता देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande