
लातूर, 23 मार्च (हिं.स.)।
: भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे आणि प्रा. एस. जी. कोडचे तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis