औषध निरीक्षकपदास आठ हजार परीक्षार्थी 'एमपीएससी'च्या परीक्षेत 30 टक्के उमेदवार गैरहजर
छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) ''औषध निरिक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा गट ब चाळणी परीक्षा-२०२५'' घेण्यात आली. शहरातील विविध केंद्रावरुन आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आय
औषध निरीक्षकपदास आठ हजार परीक्षार्थी 'एमपीएससी'च्या परीक्षेत 30 टक्के उमेदवार गैरहजर


छत्रपती संभाजीनगर, 23 मार्च (हिं.स.)।

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) 'औषध निरिक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा गट ब चाळणी परीक्षा-२०२५' घेण्यात आली. शहरातील विविध केंद्रावरुन आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

आयोगाच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी सकाळी नऊ वाजेपासून परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा सुरू होण्याच्या दीड तास अगोदर परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याबाबतची सुधारित कार्यपद्धतीचा उल्लेख आयोगाने केला होता. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर निश्चित वेळेच्या दोन तास आधीपासून उपस्थित होते. अर्धा तास अगोदर परीक्षा इमारतीचे मुख्यद्वार बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काही मिनिटे उशिराने आलेल्यांना काही उमेदवारांना प्रवेश मिळाला नसल्याचीही चर्चा आहे. औषधनिरिक्षक पदासाठीची ही परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात ३६ शाळा, महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरून ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन ११ हजार ६४० उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३ हजार ५६९ विद्यार्थी गैरहजर राहिले. नोंदणी केलेल्यांपैकी ६९.३३ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर गैरहजेरीचे प्रमाण ३०.६७ टक्के एवढे होते. परीक्षेसाठी १ हजार २३४ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande