बाळापूरमध्ये घरफोडी,3.62 लाखांचे दागिने लंपास.
अकोला, 24 मार्च (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील शोएब कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 3 लाख 62 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्
बाळापूरमध्ये घरफोडी,3.62 लाखांचे दागिने लंपास.


अकोला, 24 मार्च (हिं.स.)।अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील शोएब कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 3 लाख 62 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिर्झा निसार बेग हे आपल्या कुटुंबासह नातेवाईकांकडे गेल्यानंतर घराला कुलूप लावून गेले होते.घरी परत आल्यावर घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसून आले. घरातील बेडरूमचे दरवाजे व कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे नेकलेस, अंगठ्या, बाळी, चेन तसेच चांदीचे दागिने असा एकूण 3.62 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.या प्रकरणी बाळापुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande