जळगाव - एमडी ड्रग्जसह दांपत्याला अटक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव , 24 मार्च (हिं.स.) जिल्ह्यातील भडगाव येथे पोलिसांनी सापळा रचून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह दांपत्याला अटक केल्याची मोठी कारवाई उघडकीस आली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा अंमली पदार्थ सापडल्
जळगाव - एमडी ड्रग्जसह दांपत्याला अटक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव , 24 मार्च (हिं.स.) जिल्ह्यातील भडगाव येथे पोलिसांनी सापळा रचून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह दांपत्याला अटक केल्याची मोठी कारवाई उघडकीस आली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तालुक्यात प्रथमच अशा प्रकारचा अंमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. भडगाव शहरातील जुन्या पारोळा रस्त्यावर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला.

यावेळी संशयित वाहनाची तपासणी करताना आरोपींकडून १४ ग्रॅम ३५० मिलिग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईत पोलिसांनी ड्रग्जसह कारही जप्त केली असून एकूण ६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी योगेश हरी चौधरी आणि सरगम योगेश चौधरी या दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता, याचा शोध घेतला जात आहे.जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जचे नमुने पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande