अकोला: ठाकरेंचे सहा पैकी चार नगरसेवक शिंदे गटात
अकोला, 24 मार्च (हिं.स.)। अकोला महापालिकेच्या निवडणुकांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सहाही नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला होता. मात्र नागरिकांच्य
Photo


अकोला, 24 मार्च (हिं.स.)। अकोला महापालिकेच्या निवडणुकांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सहा जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सहाही नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी सहापैकी चार नगरसेवकांनी उबाठा गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. या घडामोडीमुळे अकोला शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता सहा पैकी चार नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेत शिंदे गटाशी जवळीक वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर या चारही नगरसेवकांनी आज सहाही नगरसेवकांची एकत्रित बैठक बोलावली होती. या बैठकीत जुन्या गटनेत्याला पायउतार करून नवीन गटनेता निवडण्याची प्रक्रिया करण्यात आली. आजच्या बैठकीत नगरसेवक विजय इंगळे आणि अशोक खुमकर हे अनुपस्थित होते. दुसरीकडे उबाठा गटाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून गटनेते विजय इंगळे यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात नगरसेविका सुरेखा काळे, मनोज पाटील, सोनाली सरोदे आणि सागर भारुका यांनी मूळ राजकीय पक्षातून इतर राजकीय पक्षात बेकायदेशीर विलीनीकरण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आज सहापैकी चार नगरसेवक उपस्थित असल्याने एकमताने सागर भारुका यांची नव्या गटनेत्यापदी निवड करण्यात आली आहे. आता बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि उबाठा गटाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे...

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande