
अकोला, 24 मार्च (हिं.स.)। सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने दि. 26 मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने सकाळी 10 वाजता भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिर येथून प्रारंभ होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे.
रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणून श्रीराम, लक्ष्मण व सीता माता यांच्या प्रेक्षणीय झाकी सादर करण्यात येणार असून भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, आज आयोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार मुन्ना उकर्डे यांची अध्यक्षपदी, बबन पवार व अमर भगत यांची उपाध्यक्षपदी, रोशनराज यांची सचिवपदी, वृषभ गायकवाड यांची सहसचिवपदी तर निहार अग्रवाल यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या बैठकीस राजेश मिश्रा मंगेश काळे नगरसेवक सागर भारुका, मनोज बीसेन, निहारजी अग्रवाल, नगरसेवक मनोज पाटील, रमेश गायकवाड, गजानन चव्हाण, रवी भामरे, अमर भगत, संग्राम खानजोडे, बंडूभाऊ नायसे, कैलास भाऊ तांदळे, किरण भाऊ ठाकूर, पंकज काळे, अजय भटकर, कैलास भाऊ खोरे, हरिओम पांडे, योगेश बुंदेले, बाळू ढोले पाटील, कुणाल शिंदे, चेतन मारवाल, अश्विन पांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
समितीच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रॅली व कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे