
अमरावती, 24 मार्च (हिं.स.) - अशोक खरात प्रकरणावर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण देत निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी महादेव मंदिरात नेले असता त्या ठिकाणी अशोक खरात उपस्थित होते. त्यांनी सत्कार केल्यामुळे व ते वयाने मोठे असल्याने परंपरेनुसार त्यांच्या पाया पडल्याचे कडू यांनी सांगितले. मात्र, आम्ही त्या भोंदू बाबांचा निषेध करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कडू म्हणाले की, समाजातील लोकांच्या भावना जपण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागते. परंतु खरात यांच्या बाबतीत जे काही सांगितले गेले ते पूर्णपणे चुकीचे ठरले. त्या वेळी ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी कडू यांनी असा आरोप केला की, काही व्हिडिओ मुद्दाम बाहेर काढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राधा कृष्ण विखे पाटील,चंद्रकांत दादा पाटील,जयंत पाटील हेही त्या महाराजांकडे गेले होते, मग त्यांना कोणी प्रश्न विचारले का? असा सवाल त्यांनी केला.
तसेच, केवळ फोटो किंवा भेटीच्या आधारे कोणालाही आरोपी ठरवणे चुकीचे असल्याचे कडू यांनी सांगितले. त्यांनी आपली खरात यांच्याशी झालेली भेट ही केवळ योगायोगाने झाली असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी