रत्नागिरी : खेडमध्ये लहान मुलांसाठी डोळ्यांवरील विशेष जागरूकता शिबिर
रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे खेड नगरपालिका आणि सहजीवन प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी डोळ्यांच्या समस्या, डोळ्यांची काळजी आणि तिरळेपणा याविषयी विशेष जागरूकता शिबिर पार पडले. या शिबिरात अखिल
रत्नागिरी : खेडमध्ये लहान मुलांसाठी डोळ्यांवरील विशेष जागरूकता शिबिर


रत्नागिरी, 24 मार्च, (हिं. स.) : इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे खेड नगरपालिका आणि सहजीवन प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी डोळ्यांच्या समस्या, डोळ्यांची काळजी आणि तिरळेपणा याविषयी विशेष जागरूकता शिबिर पार पडले.

या शिबिरात अखिल भारतीय बालनेत्र रोग तज्ज्ञ विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले. डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक सवयी आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.

कार्यक्रमास खेडच्या नगराध्यक्ष सौ. माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, डॉ. साधना धारिया तसेच सहजीवन शाळेचे प्राचार्य प्रदीप चव्हाण उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी लहान मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी अशी उपक्रम राबवल्याबद्दल इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे कौतुक केले. पालकांनीही मुलांच्या आरोग्याबाबत सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande