
नाशिक, 24 मार्च (हिं.स.)। भोंदू बाबा असलेल्या अशोक खरात याच्यावरती नाशिकच्या न्यायालयामध्ये भूमाचा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला परंतू पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या न्यायालयात आल्यामुळे काहीसा गोंधळ देखील निर्माण झाला होता.
भोंदू बाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी मंगळवारी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी त्याच्या रिवाल्वर मधील पाच राऊंड उपलब्ध झालेले नाही त्यामुळे त्याने नरबळी घेतला की काय असा संशय व्यक्त करत नरबळी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान हे सर्व घडत असताना ज्यावेळी न्यायालयातून भोंदू बाबा खरात याला परत घेऊन जात असताना ब्रिगेडचे कार्यकर्ते अचानक सक्रिय झाले त्यांनी त्याच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. ज्यावेळी खरात याला न्यायालयात आणले त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यादेखील न्यायालयात हजर झाल्या. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता पण पोलिसांनी या सर्व परिस्थिती वरती लागलीच हस्तक्षेप केला त्यामुळे मोठा प्रसंग टळला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV