
डोंबिवली, 24 मार्च (हिं.स.)।शहरात सिलेंडर बुक करूनही मिळत नसल्याने नागरिकांनी आपापल्या वाहनातून, रिक्षातून, दुचाकीवरून रिकामा सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीकडे धाव घेताना दिसून येत आहेत.
कडक उन्हात उभे राहून बुक केलेला सिलेंडर मिळण्याकरतां नागरिकांची धडपड सुरु आहे. मंगळवारी पूर्वेकडील मिलापनगर येथील नागरिकांची रस्त्यावर लागलेली रांग मोठी होती. मात्र सर्वजण सरकारला विनंती करत आहेत की लवकरात लवकर गॅस सिलेंडर नागरिकांना मिळावा यासाठी प्रयत्न करा असे वातावरण सध्या आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi