धरणे आटली, नळ कोरडे; रायगडमध्ये टंचाईचे सावट
रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून पेण तालुक्यातील १७ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. वाशी व सरेभग परिसरातील गावांना मार्चच्या मध्यापासूनच टँ
**रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; पेण तालुक्यातील १७ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू**  **प्रतिनिधी :** रायगड जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून पेण तालुक्यातील १७ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. वाशी व सरेभग परिसरातील गावांना मार्चच्या मध्यापासूनच टँकरने पाणी द्यावे लागत असल्याने परिस्थितीची गंभीरता स्पष्ट होत आहे.  जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामीण भागात महिला व लहान मुले दोन ते तीन किलोमीटर अंतर चालत पाणी भरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी नळाला दोन ते तीन दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्याची चातकासारखी प्रतीक्षा करावी लागत आहे.  दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यावर लाखो रुपयांचा खर्च होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. धरणांमध्ये साचलेला गाळ न काढणे, तसेच पाण्याचे योग्य नियोजन न होणे ही टंचाईची प्रमुख कारणे असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.  सध्या पेण तालुक्यातील १७ वाड्यांना दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र पुढील काही दिवसांत ही समस्या संपूर्ण जिल्ह्यात गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेण, खालापूर, रोहा, सुधागड, अलिबाग, महाड, पोलादपूर, उरण, तळा व म्हसळा या तालुक्यांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ कोटी ३० लाख रुपयांचा संभाव्य आराखडा तयार केला असून टंचाईग्रस्त भागांत टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा, विंधणविहिरी खोदणे तसेच पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे.  दरम्यान, जिल्ह्यातील २८ धरणांपैकी ७ धरणांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा उरला असून सध्या पाणीपुरवठ्यात २० ते २५ टक्के कपात करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील उमटे धरणातील पाणीही कमी झाल्याने संबंधित गावांना एक ते दोन दिवसाआड पाणी दिले जात आहे.  ‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी रायगड जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील १,४२२ योजनांपैकी तब्बल ६०७ योजना अद्याप अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे.  एकूणच, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरत्या उपायांवर भर दिला जात असल्याने दरवर्षी तीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून पेण तालुक्यातील १७ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. वाशी व सरेभग परिसरातील गावांना मार्चच्या मध्यापासूनच टँकरने पाणी द्यावे लागत असल्याने परिस्थितीची गंभीरता स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामीण भागात महिला व लहान मुले दोन ते तीन किलोमीटर अंतर चालत पाणी भरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी नळाला दोन ते तीन दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्याची चातकासारखी प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यावर लाखो रुपयांचा खर्च होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. धरणांमध्ये साचलेला गाळ न काढणे, तसेच पाण्याचे योग्य नियोजन न होणे ही टंचाईची प्रमुख कारणे असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

सध्या पेण तालुक्यातील १७ वाड्यांना दोन टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र पुढील काही दिवसांत ही समस्या संपूर्ण जिल्ह्यात गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेण, खालापूर, रोहा, सुधागड, अलिबाग, महाड, पोलादपूर, उरण, तळा व म्हसळा या तालुक्यांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ कोटी ३० लाख रुपयांचा संभाव्य आराखडा तयार केला असून टंचाईग्रस्त भागांत टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा, विंधणविहिरी खोदणे तसेच पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील २८ धरणांपैकी ७ धरणांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाणीसाठा उरला असून सध्या पाणीपुरवठ्यात २० ते २५ टक्के कपात करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील उमटे धरणातील पाणीही कमी झाल्याने संबंधित गावांना एक ते दोन दिवसाआड पाणी दिले जात आहे.

‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी रायगड जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील १,४२२ योजनांपैकी तब्बल ६०७ योजना अद्याप अपूर्ण असल्याची बाब समोर आली आहे. एकूणच, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरत्या उपायांवर भर दिला जात असल्याने दरवर्षी तीच परिस्थिती निर्माण होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande