लातूर - बचत गटाच्या हिरकणींनी हाटमध्ये केली 33.79 लाखाची उलाढाल
लातूर, 24 मार्च (हिं.स.)। ग्रामीण महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उमेद अभियानाने सुरू केलेला हिरकणी हाट उपक्रम आता जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी आर्थिक परिवर्तनाचे साधन ठरत आहे. उमेद महाराष्ट्र राज्य
हिरकणी हाट


लातूर, 24 मार्च (हिं.स.)। ग्रामीण महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उमेद अभियानाने सुरू केलेला हिरकणी हाट उपक्रम आता जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी आर्थिक परिवर्तनाचे साधन ठरत आहे.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित हिरकणी हाट विक्री व प्रदर्शनाला आज लातूरकरांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी आपल्या हस्तकला, खाद्यपदार्थ, सेंद्रीय शेती उत्पादने व गृहोद्योग वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन मांडले आहे.

मागील चार दिवसात हिरकणी हाट मध्ये 33.79 लाखाची विक्रमी उलाढाल झाली असून लातूरकर ग्राहकांचा प्रतिसाद व खरेदीमुळे स्टॉल धारक महिलांमध्ये समाधान दिसून येत आहे.

*उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत, हिरकणी हाट त्याचे जिवंत उदाहरण आहे!*

— संजय इंगळे

प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातूर

*उमेद अभियानाने आम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. हिरकणी हाटमुळे आमच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली!*

— गंगा पन्हाळे

बचत गट स्टॉल धारक महिला

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande