रत्नागिरीत ‘श्री रामरक्षा भावार्थ सार’ कार्यक्रम – संध्या सप्रे यांची प्रेरक मांडणी
रत्नागिरी, २४ मार्च (हिं.स.) : रामरक्षा हा आपल्या ऋषीमुनींनी दिलेला अमूल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ता संध्या सप्रे यांनी केले. राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशीजी केळकर यांनी लिहिलेल्या रामायण प्रवचनांच्या वाचनातून समित
रामरक्षेविषयी बोलताना सौ संध्या सप्रे


रत्नागिरी, २४ मार्च (हिं.स.) : रामरक्षा हा आपल्या ऋषीमुनींनी दिलेला अमूल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ता संध्या सप्रे यांनी केले.

राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशीजी केळकर यांनी लिहिलेल्या रामायण प्रवचनांच्या वाचनातून समितीच्या सेविकांना सातत्याने रामायणाकडे तार्किक दृष्टिकोन प्राप्त होत आहे. या प्रेरणेतूनच श्रीराम नवरात्रोत्सवाच्या औचित्याचा लाभ घेऊन टिळकनगर उद्यान येथे ‘श्री रामरक्षा भावार्थ सार’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला.कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात झाली. शहर बौद्धिक प्रमुख स्मिता जोशी यांनी प्रास्ताविक केले आणि मुख्य वक्ता संध्या सप्रे यांचा परिचय करून दिला.

संध्या सप्रे या संस्कृत व इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवीधर असून सध्या रा. भा. शिर्के प्राशाळेत अध्यापन कार्य करत आहेत. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत रामरक्षेचा भावार्थ समजावून सांगितला. त्यांनी म्हणाले, “रामरक्षेचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करणे हे आपले कर्तव्य आहे. जर पूर्ण रामरक्षा म्हणणे शक्य नसेल, तर दैनंदिन कामे करताना केवळ ‘राम’ या दोन अक्षरांचा जप केला तरी जीवनात सफलता येते. रामनामाच्या बळावर आपण जीवनरूपी भवसागर नक्कीच तरून जाऊ शकतो.”कार्यक्रमाचा समारोप दक्षिण रत्नागिरी सह-प्रचार प्रमुख कामाक्षी गद्रे यांनी आभार प्रदर्शन करून केला. शेवटी समितीची प्रार्थना आणि संपूर्ण ‘वंदे मातरम्’ होऊन सांगता झाली. या कार्यक्रमाला नागरिकांची आणि सेविकांची उत्साही उपस्थिती लाभली.------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande